मुरगूड ( शशी दरेकर ) : अनंतकोटी ब्रम्हांडनायक , राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशा जयघोषात स्वामी समर्थ प्रकट दिन मुरगूड बाजारपेठ येथिल सर्वपरिचीत असणारी श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य शाखेत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला .
संस्थेचे संचालक सौ / श्री संदीप कांबळे , अरुणा कांबळे यांच्या हस्ते स्वामींच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले.


या स्वामी प्रकटदिन प्रसंगी संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर , व्हा. चेअरमन प्रकाश सणगर, संचालक प्रशांत शहा, किशोर पोतदार, साताप्पा पाटील, शशिकांत दरेकर, नामदेवराव पाटील, हाजी धोंडीराम मकानदार, निवास कदम, संचालिका सौ. रोहिणी तांबट, सौ. सुनंदा जाधव, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर यांच्यासह सुरेश जाधव, शुभांगी गवाणकर , कर्मचारी वर्ग स्वामी समर्थ भक्त उपस्थित होते.