मुरगूड येथे मुरगुड पोलीस स्टेशन मार्फत वाहतूक सदर्भात व्यापाऱ्यांची बैठक संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर )

        मुरगूड पोलीस स्टेशन यांच्या वतीने मुरगूड शहरातील व्यापारी संघटना पदाधिकारी व इतर व्यापारी यांची बैठक घेण्यात आली.

सध्या मुरगूड शहरामध्ये जवाहर रोड चे काम सुरू असून मुख्य बाजारपेठ मार्गे एसटी व इतर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सर्व व्यापारी यांनी फुटपाथ वरील मारणेत आलेली राहुटी व इतर अडथळे दूर करावेत, व्यापारी आस्थापनाची बोर्ड व खाजगी व इतर वाहणांचे मुळे रहदारीस अडथळा होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, मंगळवार रोजीचे आठवडा बाजार दिवशी पर्यायी वाहतूक बाबत या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

Advertisements


या बैठकीमध्ये व्यापारीतर्फे आनंदा गोरुले, उद्धव मिरजकर, मकरंद धर्माधिकारी, सागर चौगुले अमर कापसे, सुखदेव खराडे यांनी चर्चेमध्ये  सहभाग नोंदवला. सदर बैठकीस मुरगूड नगरपरिषद कडील अभियंता श्री रोहित आतवाडकर व व्यापारी संघटना अध्यक्ष मा.सदाशिव आंगज यांच्यासह मुरगूड शहरातील ५० हून अधिक व्यापारी उपस्थित होते.

यावेळी व्यापाऱ्यांना मुख्य मार्गदर्शन एपीआय शिवाजी करे यांनी केले  स्वागत प्रशांत गोजारे यांनी तर आभार राजू चव्हाण यांनी मानले.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!