‘शाहू’चे दर्जेदार पशुखाद्य पशुपालकांच्या पसंतीस उतरेल – राजे समरजितसिंह घाटगे

व्हन्नूरमध्ये ‘श्री. छत्रपती शाहू पशु आहार’ विक्री शुभारंभ सोहळा

सिद्धनेर्ली (प्रतिनिधी ) : पशुपालकांच्या मागणीनुसार शाहू दूध संघ व शाहू कृषी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.छत्रपती शाहू पशु आहाराची निर्मिती केली आहे. हे दर्जेदार पशुखाद्य जनावरांसाठी परिपूर्ण आहार असल्यामुळे पशुपालकांच्या पसंतीस उतरेल. असा विश्वास शाहू उद्योग समूहचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला.

Advertisements

व्हन्नूर (ता.कागल) येथे शाहू दूध संघाच्या कार्यस्थळावर शाहू दूध संघ व शाहू कृषी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्पादित करण्यात आलेल्या ‘श्री. छ. शाहू पशू आहार’ पोती पूजन व विक्री शुभारंभवेळी ते बोलत होते.

Advertisements

राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले,शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्थापन झालेला शाहू दूध कर्जमुक्त असून गुणवत्तापुर्ण उत्पादनांमुळे ‘शाहू दूध’ हा ब्रँड बाजारात विश्वासार्ह ठरला आहे.याच परंपरेतून पशुपालकांच्या आग्रही मागणीनुसार पशू आहार निर्मितीचा हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

दूध व्यवसाय अधिक सक्षम आणि व फायदेशीर करण्यासाठी जनावरांच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला हा आहार पन्नास किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध असून, शाहू दूध संघाशी संलग्न संस्थांच्या माध्यमातून दूध उत्पादकांना क्रेडिटवर पुरविण्यात येणार आहे.

राजे बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे म्हणाल्या,“पशुपालकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी जनावरांची दूध उत्पादनवाढ व भाकड काळ कमी करणे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. शाहूचा दर्जेदार पशू आहार उपलब्ध झाल्यामुळे दूध व्यवसाय अधिक फायदेशीर ठरेल. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार वित्तीय सहाय्य देण्यासाठी राजे बँक सदैव तत्पर आहे.

कार्यक्रमास शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील,संचालक सचिन मगदूम, सुनिल मगदूम,भाऊसाहेब कांबळे,अमोल पाटील,विकास पाटील,यांच्यासह शाहू दूध,कृषी संघाचे संचालक,दूध उत्पादक व शेतकरी उपस्थित होते.

स्वागत प्रशासकीय अधिकारी संग्राम पाटील यांनी केले. प्रास्ताविक शाहू कृषीचे कार्यकारी संचालक सदानंद घोरपडे यांनी केले. शाहू दूध संघाचे असि. अजरल मॅनेजर दिपक पाटील यांनी आभार मानले.

शाहू पशु आहार दर्जेदार व परिपुर्ण पशुखाद्य

गायी व म्हैशींसाठी परिपूर्ण व संतुलित आहारअसलेल्या या पशुखाद्यामुळे जनावरांच्या दूध व फॅटच्या प्रमाणात वाढ होऊन सातत्य राहते.भाकड काळ कमी करून वेळेवर माजावर येण्यास उपयुक्त आहे.जनावरांचे आरोग्य सुदृढ ठेवून औषधोपचाराचा खर्च कमी करण्यास मदत होते. त्यामुळे एक दर्जेदार व परिपुर्ण पशुखाद्य म्हणून पशुपालकांनी जनावरांसाठी वापर करावा असे आवाहन राजे समरजसिंह घाटगे यांनी केले.

Leave a Comment

error: Content is protected !!