मुरगूड येथे छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनानिमित्य  शिवप्रेमीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथे बाजारपेठ शिवप्रेमीतर्फै छ. शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisements

        गुरुवार दि .१९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सकाळी ठि.१० वाजता. छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उद्योजक मा. श्री. विजय सापळे यांच्या शुभहस्ते व आनंदराव कल्याणकर ( सर ), सौ.विद्या पॅलीस फर्नांडिस (उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या मालवण शहर) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.  

Advertisements

त्यानंतर “छ.शिवरायांचे आज्ञा पत्र” हा विषय घेऊन विनय कुलकर्णी ( सर ) यांचे व्याख्यान होणार आहे.
यानंतर सौ. समिरा जमादार, सौ. माया मोरबाळे, सौ रंजना देवळे, सौ. विजयमाला शिंदे ( नगरसेविका ), सौ. वैशाली गोधडे ( नगरसेविका), श्री. शंकर कांबळे, आकाश दरेकर ( इंजिनियर ), गौरव मोर्चे, जान्सन बारदेस्कर, अमर देवळे या मान्यवरांच्या उपस्थितीत माजी शिक्षकांचा सत्कार समारंभाचे आयोजन केले.

या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनानिमित्य होणाऱ्या सर्व  कार्यक्रमास सर्व शिवप्रेमिनीं. व नागरीकानीं उपस्थित रहावे असे आवाहन मुरगूड येथिल शिवप्रेमी व शिवभक्त धोंडीराम परीट (जय – महाराष्ट्र ) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!