भागशाळा कपिलेश्वर शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण व सदिच्छा समारंभ उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ):

शालेय जीवनात विद्यार्थ्याच्या बाल मनावर झालेले संस्कार बहुभोल असतात. या  संस्कारांच्या शिदोरीवरच भावी आयुष्यात येणारी आव्हाने पेलता येतात. असे प्रतिपादन  श्री शाहू कुमार भवन, मजरे कासारवाडा,  तालका राधानगरी, भाग शाळा कपिलेश्वर,(तालुका राधानगरी) या  संस्थेचे सदस्य   श्रीकांत भोसले यांनी  केले.

भाग शाळा कपिलेश्वरचे वार्षिक पारितोषिक वितरण व सदिच्छा समारंभा निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. कपिलेश्वरचे सरपंच शहाजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहून मनस्वी समाधान व्यक्त करत ते म्हणाले यापुढे शाळेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
  यावेळी बी. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगतातून त्यांनी   विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षां बाबत इत्यंभूत  मार्गदर्शन केले.

शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा झाल्या. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये क्रीडाशिक्षक एस बीचौगले, एम.एस.वारके, सौ.पी.आर वरोटे यांची मनोगते झाली. सदिच्छा समारंभात पालकांमधून शहाजी मुसळे यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेबद्दल तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी घेतलेल्या  श्रमाचा  आवर्जुन उल्लेख करत त्यांनी दिलेल्या योगदाना बद्दल कौतुक करून समाधान व्यक्त केले.
  विनायक भोई यांनीही  यावेळी मनोगत व्यक्त केले. स्वराज चव्हाण, तनिष्का म्हाळुंगेकर, राधिका तौंदकर, यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. इयत्ता  दहावीचे  विद्यार्थी  श्रीयश पाटील, श्रावणी वराळे, समीक्षा भांदिगेरे  हे सारेजण मनोगत व्यक्त करतांना भाऊक झाले. परिणामी उपस्थित विद्यार्थी भाऊक तर झालेच शिवाय साऱ्यांना अश्रुंना आवर घालणे अशक्य झाले. आणि कांही काळ वर्गातलं वातावरण शांत शांत झालं.

या कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य सुनील पाटील  विश्वास पाटील(बापू), डी आर पाटील, रघुनाथ वरोटे, दादासो पाटील, एन के कोरे, प्रा. संजय हातकर  आदी  उपस्थित होते.

प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक आर बी पाटील  यांनी प्रास्ताविक, स्वागत  विभाग प्रमुख सौ एस एस कांबळे यांनी केले.सूत्रसंचालन. तन्मयी पाटील, ज्ञानेश्वरी पाटील, यांनी तर आभार सिद्धी मनुगडे हिने मानले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!