बोली ह्या भाषेला समृद्ध बनवतात – प्राचार्य  डॉ.शिवाजी होडगे “मराठी भाषा आणि बोली” भित्तिपत्रकाचे उदघाटन

मुरगूड ( शशी दरेकर )

बोली ह्या भाषेला समृद्ध बनवतात असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले. ते मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘मराठी भाषा आणि बोली’  भित्तिपत्रकाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ते आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात मराठीच्या अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. या बोली त्या प्रदेशातील संस्कृती, समाजजीवन आणि परंपरेचा आरसा असतात. त्यामुळे बोलीचे जतन आणि संवर्धन करणे ही आजच्या काळात आपली जबाबदारी आहे. कोणतीही बोली ही शुद्ध अथवा अशुद्ध नसते. तिच्याकडे डोळसपणे पाहून आपण बोली टिकवल्या पाहिजेत.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. सुखदेव एकल यांनी केले. हे भित्तिपत्रक बी ए भाग एक च्या विद्यार्थ्यांनी कु. साऊताई कळमकर, मेघा कांबळे, प्रणाली भराडे यांनी संकलन आणि संपादन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. (डॉ.)शिवाजी पोवार, नॅक समन्वयक सौ.डॉ.माणिक पाटील, लेफ्ट. प्रा. विनोदकुमार प्रधान,  प्रा. दादासाहेब सरदेसाई, प्रा.एम. एच. सोहनी, प्रा.राम पाटील प्रा. सुहास गोरुले, प्रा. गुरुनाथ सामंत, प्रा. धनाजी खतकर, प्रा. दिपाली सामंत,प्रा. अर्चना कांबळे,प्रा. मनीषा सावेकर, प्रा.संदीप मोहिते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.आर. एस. पाटील तर आभार प्रा. सोहम डाफळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मराठी विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!