आपलं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ जयघोषाने परिसर दुमदुमला; नामविस्ताराच्या मागणीला शिवप्रेमींचा जोरदार विरोध

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या मागणीवरून विद्यापीठाचा परिसर आज (दिनांक) ‘आपलं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ या जयघोषाने दुमदुमला. काही मंडळींकडून विद्यापीठाचे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करण्याची भावनिक मागणी केली जात आहे. मात्र, कालांतराने या नावाचा शॉर्टफॉर्म ‘CSM विद्यापीठ’ होईल, अशी भीती व्यक्त करत हजारो शिवप्रेमींनी विद्यापीठाचे नाव ‘शिवाजी विद्यापीठ’च कायम ठेवावे, यासाठी जोरदार निदर्शने केली.

Advertisements

यावेळी जमलेल्या शिवप्रेमींनी ‘आपले विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच, विद्यापीठाचे नाव कोणत्याही परिस्थितीत बदलू देणार नाही, अशी शपथ घेतली. त्यानंतर आंदोलक शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना याबाबत निवेदन सोपवले.

Advertisements

शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे उपाध्यक्ष व माजी आधिसभा सदस्य मा. प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने यांनी सांगितले की, काही लोक केवळ शॉर्टफॉर्म करता यावा यासाठी विद्यापीठाच्या नावाचा विस्तार करण्याची मागणी करत आहेत. यामागे त्यांची वेगळी भूमिका असू शकते. मात्र, शिवाजी विद्यापीठाची आजवरची ओळख आणि महत्त्व कायम राखण्यासाठी त्याचे नाव बदलणे योग्य नाही.

Advertisements

या आंदोलनात शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख मा. विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष मा. बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे कोल्हापूर शहराध्यक्ष मा. आर के पवार, मराठा महासंघाचे प्रमुख मा. वसंतराव मुळीक, मा. व्यंकप्पा भोसले, मा. सचिन चव्हाण, मा. हर्षल सुर्वे, मा. प्राचार्य व्ही एम पाटील, प्राचार्य मा. आर के शानेएदिवाण, मा. संजय चितारी, मा. व्हि. एम. पाटील सर, मा. क्रांतिकुमार मोरे यांच्यासह विद्यापीठ विकास आघाडीचे आधिसभा सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने विद्यापीठाचे नाव ‘शिवाजी विद्यापीठ’च राहण्यासाठी आपला निर्धार व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!