मुरगुड (शशी दरेकर) : मुरगूड नगरपरिषद ,मुरगुड कडून शहरामध्ये शंभर टक्के घरपट्टी , पाणीपट्टी वसुलीसाठी नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. आतिश वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी नगरपालिकेच्या वतीने शहराच्या वेगवेगळ्या भागात चार टीम नियुक्त केलेल्या आहेत.
जे मिळकतदार थकबाकीच्या यादीमध्ये आहेत, त्यांच्यावरती नगरपालिकेच्या वतीने जप्तीची तसेच नळ कनेक्शन बंद करणे,थकीत गाळे धारकांच्या वरती गाळा सिल करणे करणे यासारख्या कारवाई सुरू केल्या आहेत.

आजअखेर एकूण एक कोटी आठ लाख घरपट्टी पैकी 98 लाख साधारण 90% व एकूण 32 लाख पाणीपट्टी पैकी 28 लाख साधारण 90% वसुली झालेली आहे. ज्या मिळकत धारकांनी अजून देखील घरपट्टी ,पाणीपट्टी जमा केली नाही त्यांना 31 मार्चपूर्वी ती भरावी या करता नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री अतिश वाळुंज यांनी आवाहन केलेले आहे.