आदर्श राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल  प्रा सुनिल डेळेकर यांचा मुरगुडमध्ये नागरी सत्कार संपन्न

मुरगूड (शशी दरेकर) : मला मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून संपूर्ण मुरगुडवासीयांचा आहे असे प्रतिपादन प्रा. सुनील डेळेकर यांनी केले ते मुरगूड शहरातर्फे आयोजित “लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ” यांचा राज्यस्तरीय ” आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्ल नागरी सत्कार कार्यक्रमानिमित्त बोलत होते.   

Advertisements

प्रा. सुनील डेळेकर यानीं ३५ वर्ष मुरगुड शहराचे विविध प्रश्न बातमीच्या माध्यमातून मांडल्याबद्ल संत सद्गुरू बाळूमामा भाकणूककार गुरुमाऊली कृष्णात डोणे यांच्या हस्ते नागरी सत्कार करुन सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे  होते.   

Advertisements

यावेळी स्वागत ओंकार पोतदार यांनी केले . प्रास्ताविक प्रा. रवींद्र शिंदे यांनी  केले .  यावेळी अनिल सिद्धेश्वर, दगडू शेणवी, संकेत भोसले यांची अभिनंदनपर भाषणे झाली. सोमनाथ यरनाळकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास मुरगुड शहरातील राजकीय, सामाजिक, क्रीडा , व्यापार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

या नागरी सत्कार कार्यक्रमात जीवनराव साळोखे ,जोतिराम सूर्यवंशी, नामदेवराव मेंडके,किरण गवाणकर ,जयसिंग भोसले , एस. व्ही. चौगले, सुहास खराडे, संभाजी आंगज, रणजीत सूर्यवंशी, संतोष भोसले, विशाल सूर्यवंशी, अमर सनगर, विक्रम गोधडे, दत्ता मंडलिक, बाळकृष्ण खामकर, रामचंद्र सातवेकर, विजय सापळे, बजरंग सोनुले,दिलीप कांबळे, सुनिल गवाणकर, राजू भाट, अँथोनी बारदेस्कर ,तानाजी भराडे, सर्जेराव भाट, प्रकाश पारिशवाड,संकेत शहा, जगदीश गुरव, अनुबोध गाडगीळ, महादेव वागवेकर, प्रशांत सिद्धेश्वर, पत्रकार बंधू  यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!