
मुरगूड (शशी दरेकर) : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची निर्घुण हत्या करण्यात आली . या हत्तेतील आरोपींना आणि त्याच्या मागे असणाऱ्या संबंधित घटकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मुरगुड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना संकेत भोसले यांनी सांगितले की युवा सरपंच ज्यांचा मराठा आंदोलनामध्ये आणि गावच्या विकासामध्ये मोठा सहभाग होता. अशा व्यक्तीची हत्या म्हणजे संपूर्ण समाजाला काळीमा फासणारी घटना आहे.
त्यांची निर्घृण हत्या करताना अमानुषपणे त्यांना मारहाण करण्यात आली त्यामुळे संबंधित आरोपींना फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली . यावेळी सकल मराठा समाज मुरगूड चे संतोष भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. निवेदन देण्यासाठी मराठा समाज, मुरगुड शहर नागरिक यांनी मोठी गर्दी केली होती .सर्वांनीच आरोपींना फासी शिक्षा व्हावी अशी मागणी केली.
यावेळी मुरगुडचे एपीआय शिवाजी करे यांनी निवेदन स्वीकारून आपली मागणी संबंधित तपास विभागाकडे पोहोच करू असे आश्वासन नागरिकांना दिले.
यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, दिगंबर परीट, राहुल वंडकर, तानाजी भराडे, संकेत शहा, रणजीत मोरबाळे, अभी मिटके, पंकज मेंडके, पृथ्वी भुते, महादेव पाटील, ओंकार मेहत्तर, सुशांत सिद्धेश्वर, पृथ्वी चव्हाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Magnificent beat I would like to apprentice while you amend your site how can i subscribe for a blog web site The account helped me a acceptable deal I had been a little bit acquainted of this your broadcast offered bright clear idea