मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील विनर ॲकॅडमी फौंडेशनच्या ३८ विद्यार्थ्यांनी सीमा सरंक्षण दलाबरोबरच भारतीय सैन्य दलात व इतर विभागात स्पर्धा परीक्षेतून यश मिळविले त्यांच्या या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांचा ॲकॅडमीच्या वतीने सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा संभाजी आंगज होते. तर संजय गांधी स्वावलंबत समिती सदस्य राजू आमते ‘ माजी प्राचार्य महादेव कानकेकर ‘माजी नगरसेवक अनिल राऊत, गणेश नागरी पतसंस्थेचे नूतन चेअरमन सोमनाथ यरनाळकर, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, पत्रकार ओंकार पोतदार, राजाराम चव्हाण आदि प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी प्राचार्य महादेव कानकेकर म्हणाले ‘ ध्येयासी बांधील राहून विद्यार्थ्यांनी कष्ट घेतल्यास यश निश्चित मिळते . परीक्षेत यश मिळविताना सातत्यपूर्ण परिश्रम व प्रयत्न करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमात ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष अक्षय गोरुले यांनी स्वागत करून आपल्या प्रास्ताविकातून ॲकॅडमीच्या यशस्वी वाटचालीचा वेध घेतला.
यावेळी प्रा संभाजी आंगज . ओंकार पोतदार यांची भाषणे झाली . कार्यक्रमाचे संयोजन भाऊ परीट व ‘ सुरेश परीट आदिंनी केले सूत्रसंचालन प्रा सुनिल डेळेकर यांनी केले तर अभिजित कोपार्डे यांनी आभार मानले.
certainly like your website but you need to take a look at the spelling on quite a few of your posts Many of them are rife with spelling problems and I find it very troublesome to inform the reality nevertheless I will definitely come back again