![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240503-WA0002.jpg)
मुरगूड ( शशी दरेकर ) – पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथे लोकसभा निवडणूक कार्यक्रम २०२४ अंतर्गत निवडणूक आयोगाच्या आधीसुचनेनुसार चुनाव का पर्व देश का गर्व या संदर्भाने मतदार जागृती करण्यासाठी आणि एकूण मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महाविद्यालयामध्ये मतदारांची प्रतिज्ञा घेण्याचेआदेश दिले आहेत.
त्यानुसार “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाही वर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. ” अशी प्रतिज्ञा, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी आदिनाथ कांबळे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/05/images-31491413125873421422.jpg)
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील म्हणाले की, मताधिकार हा पवित्र अधिकारातून तो प्रत्येक नागरिकाने सजगतेने बजावला पाहिजे.भारतीय लोकशाही सुदृढ करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा.
यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. एस. पानारी, प्रा. ए. आर. महाजन, मा शेळके प्रा. वंदना पाटील इतर प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतिश देसाई, सचिव डॉ. विद्या देसाई यांचे प्रोत्साहन लाभले. या उपक्रमामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!