बाचणी,केनवडे,गोरंबे,सावर्डे पंचक्रोशीत प्रचार दौरा
साके : शाहू महाराज हे चांगले वाचक आणि आभ्यासू व्यक्तीमत्व आहे. इंग्रजी आणि मराठी भाषेवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे. करवीर संस्थानचा कृतीशील सामाजिक आणि वैचारीक वारसा ते पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम यशस्वीपणे करीत आहेत. क्रिडाप्रेमी आणि त्यात कुस्तीप्रमी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. एका आडचणीच्या पण गरजेच्या काळात ते कोल्हापूरातून लोकसभा लढवत आहेत.त्यामुळे त्यांना निवडून देणं हि काळाची गरज आहे असे प्रतिपादन शिवसेना (ठाकरे गट) माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले.
शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ बाचणी,केनवडे,गोरंबे,सावर्डे येथील आयोजित प्रचार बैठकीत ते बोलत होते. प्रमुख उपस्थित गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे होते.
श्री घाटगे पुढे म्हणाले, डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहीली त्या आंबेडकरांना शाहू महाराजांनीच कठीण परिस्थीत राजाश्रय दिला संविधान जिवंत ठेवायचे असेल तर शाहू महाराज यांनाचं मोठ्या ताकतीने निवडणून देवूया असे आवाहन त्यांनी केले.
अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, शक्तीपीठ सारखे प्रकल्प आणून शेतक-यांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न या सरकारकडून होत आहेत. स्वतःच्या राजकिय पोळ्या भाजण्यासाठी शेतक-यांना आडचणीच्या आगीत ठकलणा-या या सरकारला वेळीच पायपंद घालायचे असेल तर शाहू महारज यांच्याशिवाय पर्यायच नाही त्यामुळे शाहू महाराजांच्या विजयासाठी जिवाचं राण करूया असे ते म्हणाले.
रणजित मुडूकशिवाले,नानासो कांबळे,ए.वाय.पाटील,उत्तम वाडकर, विष्णूपंत गायकवाड,आलाबक्ष शहाणेदिवाण, सुजित खामकर,डॅा.संजय चिंदगे यांनी मनोगत व्यक्त केली.
बैठकीस साताप्पा तांबेकर,बाजीराव पाटील, दगडू चौगले, धोंडिराम एकशिंगे, शंकर सावंत, एम.एस.पाटील,महादेव आस्वले, डि.के.भोसले, पांडूरंग भोसले, संजय भोसले आदी कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते. स्वागत रणजित गायकवाड यांनी तर आभार विनायक वैद्य यांनी मानले.