मुरगूड ( शशी दरेकर ) : छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक मुरगुड शहरांमधील शिवतीर्थ येथे मंत्रांच्या उच्चारात पुष्पवृष्टी मध्ये विधिवत स्वरूपात पार पडला. शिवभक्त मुरगुड यांच्यावतीने या राज्याभिषेकाचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी दहा वाजता राज्याभिषेकाच्या विधीस सुरुवात झाली.
विविधी मंत्रांच्या उच्चारांमध्ये विठ्ठल भुते यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांना पंचामृत, दूध, जल,शिव मुद्रा यांचा अभिषेक घालण्यात आला . या अभिषेकाचे पौरोहित्य महादेव वागवेकर महाराज यांनी केले. यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराज यांची गारद देऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी बोलताना ओंकार पोतदार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यांच्या पराक्रमाची गाथा म्हणजे ते आपल्या संपूर्ण आयुष्यामधील एकही युद्ध पराजित न झालेले अपराजित योद्धा म्हणून त्यांची ओळख सर्वदूर आहे .तसेच अभ्यासू, शौर्यवान अशा छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक पुस्तके लिहिली . त्यांनी लिहिलेला बुधभूषण ग्रंथ सर्वश्रुत आहे तसेच मुरगुड लष्करी ठाण्याचे प्रमुख रुद्राप्पा नाईक देसाई यांना लिहिलेली पत्रे देखील इतिहासामध्ये उपलब्ध आहेत अशा या वीराचा इतिहास अजरामर आहे. यावेळी सोमनाथ यारनाळकर यांनी आभार मानले.
स्वागत सर्जेराव भाट यांनी केले यावेळी जगदीश गुरव, संकेत शहा, तानाजी भराडे, संकेत शहा, अक्षय बोंडगे, स्वाजित जांभळे, मयूर सावर्डेकर, चेतन गवाणकर, रणजीत मोरबाळे, प्रकाश परीशवाड, संजय घोडके आदी उपस्थित होते .
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.