श्री अंबाबाई मातेची ही आजची महापूजा

ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा । वाराही च तथेन्द्राणि चामुण्डा सप्तमातरः ||
सर्व चराचर सृष्टी श्रीदेवी मातेच्या दिव्य तेजांशातुन निर्माण झाली. यामुळे ‘एकैवाहं जगत्यत्र द्वितीया का ममापरा ।’ अर्थात अखिल ब्रह्मांडात मीच एकटी नित्य विद्यमान आहे. माझ्या व्यतिरिक्त इथे कोण आह? असे श्रीदेवीमाता म्हणते. यामुळे शुंभ-निशुंभ युद्धावेळी ‘ब्रह्मेश गुहविष्णूनां तथेन्द्रस्य च शक्तयः ।’ ब्रह्मादि देवतांची शक्तिस्वरूपे, श्रीदेवीमातेच्या साथीस, युद्धात असुरांशी लढण्यासाठी उतरल्या. श्रीदेवी मातेने शुंभ-निशुंभांचा वध केला व त्रैलोक्यास दुःख मुक्त केले.

Advertisements


श्रीदेवी महात्म्याचा (सप्तशती) अकरावा अध्याय ‘नारायणी स्तुती’ या नावाने ओळखला जातो. या अध्यायात श्रीदेवीची स्तुती करताना म्हणले आहे, ‘त्वयैकया पूरितमम्बयैतत्’ अर्थात हे माते! हे सर्व विश्व तू एकटीनेच व्यापलेले आहेस. याच अध्यायात ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, ऐन्द्री, चामुंडा या रूपात असणाऱ्या हे नारायणी! तुला नमस्कार असो.’ असे देवीचे स्तवन केले आहे. विश्वातील वेगवेगळ्या शक्ती ही एका आदिशक्तीचीच विविध रूपे आहेत, हे दर्शवणारी सप्तमातृकाशक्ति श्रीदेवी मातेची ही आजची महापूजा. आजची पूजा श्रीपूजक आशुतोष ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी साकारलेली आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!