लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या सभासदांना ३३ लाखाच्या भेटवस्तूंचे वाटप

मुरगुड(शशी दरेकर) : मुरगूड येथील सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने ३३१५ सभासदांना ३३ लाख रुपयांच्या दिवाळी भेटवस्तू वितरित केल्या. संस्था सेवकांना १२ लाख रुपये बोनस वाटप केले. आंतरराष्ट्रीय प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते भेटवस्तू वितरण केले. अध्यक्षस्थानी चेअरमन पुंडलिक डाफळे होते. 

Advertisements

डॉ. देशमुख म्हणाले, संस्थेला १ कोटी १५ लाखांवर निव्वळ नफा झाला आहे. १ ते ३० नोव्हेंबरपर्यंतच्या ठेवीसाठी ९ टक्के व्याज दिले जाणार  आहे. प्रास्ताविकात संचालक जवाहर शहा यांनी संस्थेच्या वाटचालीचा  आलेख मांडला. सभासद. पी. व्ही. पाटील यांनी मनोगत: व्यक्त केले. यावेळी उपसभापती रवींद्र खराडे, संचालक अनंत फर्नाडिस, दत्तात्रय तांबट, विनय पोतदार, चंद्रकांत माळवदे, शाखाधिकारी सौ. मनीषा सूर्यवंशी  उपस्थित होते. चंद्रकांत माळवदे यांनी सूत्रसंचालन केले. विनय पोतदार यांनी आभार मानले. दरम्यान संस्थेच्या सेनापती कापशी, सावर्ड बुद्रुक, कूर, सरवडे येथील शाखा सभासंदांना शाखाधिकारी राजेंद्र भोसले, अनिल सनगर, रामदास शिवूडकर, के. डी. ‘पाटील यांच्या हस्ते दिवाळी भेटवस्तूचे वितरण करण्यात आले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!