तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवरही कारवाई
कोल्हापूर : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्या अंतर्गत तिघांना तर लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्याअंतर्गत दोघांवर कारवाई झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि काही लोकांनी हे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केल्याने कोल्हापूर शहरात मंगळवारी संतप्त पडसाद उमटले. आजही सकाळपासून काही परिसरात प्रचंड तणाव होता. पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र काही भागात तोडफोड झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला.
कारवाईबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक पंडित म्हणाले की, “औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवरही कारवाई करण्यात आली आहे.”