कागल(प्रतिनिधी) : करनूर तालुका कागल येथील भव्य निकाली कुस्ती मैदान पेठवडगाव तालुका हातंकणंगले येथील पैलवान भूषण माळकर यांने जिंकले. पैलवान माळकर याने बैठा स्थितीमध्ये पैलवान मोहन पाटील सांगाव तालुका कागल याला चौदाव्या मिनिटाला आसमान दाखविले. पैलवान भूषण मळकर हा पाच किलो चांदीच्या गधेचा मानकरी ठरला.
येथील श्री मरीआई वगैरे यात्रेच्या निमित्ताने भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते दहा किलो पासून ते 100 किलो वजन गटातील सुमारे 104 कुस्त्या या मैदानामध्ये लावण्यात आल्या होत्या.
दुसऱ्या क्रमांकासाठी ऋषिकेश देसाई कागल व ओंकार पाटोळे टोणेवाडी यांच्यात कुस्ती झाली. यामध्ये एकलांगी डावावर ऋषिकेश देसाई हा विजेता ठरला. त्यास अशोक शिरोळे यांच्याकडून चांदीची गदा प्रदान करण्यात आली. राशिवडेचा कुलदीप पाटील याने एकलांगी डावावर विजय मिळवला. या मैदानामध्ये अंध पैलवानाने कुस्ती केली. कानूर गावचा पृथ्वी शिरोळे हा बाल पैलवान यांनी नेत्र दीपक अशी कुस्ती केली. पिराची वाडी येथील पैलवान सृष्टी भोसले हिला मिळालेल्या पुरस्कारामुळे तिचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. चटकदार व डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकिनाने मोठी गर्दी केली होती.
नामदेव बल्लाळ ,मारुती पवार ,दत्तात्रेय एकशिंगे सर्जेराव पाटील, बाबुराव मालवेकर, स्वागत पाटील ,भैरवनाथ आरेकर ,संतोष मेटकर ,भरत दंडवते ,शंकर कदम यांनी पंच म्हणून उत्कृष्ट कामकाज केले. राजाराम चौगुले हे निवेदक होते.
छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या वतीने वीरेंद्रराजे घाटगे, इम्रान नायकवडी ,रमेश लालवानी, आरपीआय आठवले गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे, अशोक शिरोळे जयसिंग घाटगे, पोपट जगदाळे ,बाळासो पाटील ,आनंदापाटील, तानाजी शिंदे, सुनील गुदले ,सचिन घोरपडे ,अमित गुदले, संग्राम गुळवे, तंटामुक्त अध्यक्ष वैभव आडके, शिवाजी घोरपडे आदींसह यात्रा कमिटीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.