मुरगूड ( शशी दरेकर ) : मानवी जीवनात योगाचे महत्व अनन्य साधारण आहे.योगाने आपले जीवन तंदुरुस्त व आनंददायी बनते. यासाठी प्रत्येकाने नियमित योगासने केली पाहिजेत असे प्रतिपादन ए .एम. चौगले यांनी केले. ते जागतिक योगदिना निमित्त शिवराज विद्यालयाच्या पटांगणावर सामुदायिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होते. प्राचार्य पी डी माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी मुरुकटे येथील योगगुरू जयराम पाटील यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. त्याचबरोबर विद्यार्थांना प्रत्येक योगासनांची सविस्तर माहितीही सादर केली . अत्यंत उत्साहाचा वातावरणामध्ये शिवराजच्या भव्य पटांगणात योगदिन सामुहिक प्रात्यक्षिका सह पार पडला.
या कार्यक्रमात क्रीडा शिक्षक इ .व्ही . आरडे, पर्यवेक्षक एस् एम कुडाळकर, व्ही बी खंदारे, प्रविण सुर्यवंशी, आर . ए .जालिमसर, एस् एस मुसळे, के डी कुदळे, एस् .एस. सुतार, ए .पी. देवडकर, बी . एस .मुल्ला, पी . डी . ढोणुक्षे, सौ .एस. जे . कांबळे, सौ . गायत्री डवरी, यांचे सह शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते . स्वागत प्रास्ताविक इ . व्ही . आरडे यांनी तर आभार एस् .एस. मुसळे यांनी मानले .
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.