मुरगूड (शशी दरेकर) : येथील मुरगूड नगरपरीषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2023 व माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते बक्षीसे देऊन गौरवण्यात आले.
यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी प्रत्येक महिलेकडून त्यांचे वेगळे कौशल्य शिकायला मिळावे यासाठीच महिलांनी कौशल्याची आदान प्रदान करण्याकरीता वरचेवर एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच नगरपरिषदेने मोठ्या संख्येने शहरातील महिलांना एकत्रित करून त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्यातील कला गुणांना वाव दिल्याने नगरपरिषदेचे कौतुक केले. यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी संदीप घार्गे यांनी नगरपरिषदेकडून यापुढेही महिलांसाठी विविध उपक्रम राबविणेत येतील असे आश्वासन दिले.
तत्पूर्वी महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार दुय्यम निबंधक श्रीमती पी. एम. पवार, अखिल भारतीय कुस्तीगीर नंदिनी साळोखे, कुस्तीगीर नेहा चौगले यांच्या हस्ते संपन्न झाला. शहरातील महिलांच्यासाठी हळदी कुंकू कार्यक्रम तसेच रणजित कदम, गौरी कालेकर, एस. के. पाटील सर यांच्या सूरताल गीतांचा कार्यक्रमही घेण्यात आला.
या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली. मिळकत व्यवस्थापक डॉ. ज्योती पाटील, नगरअभियंता प्राजक्ता पिंपळे, समुदाय संघटिका रेश्मा चौगले, स्वच्छता निरीक्षक अमर कांबळे, सुनील पाटील, अभियंता प्रकाश पोतदार, जयवंत गोधडे, रणजित निंबाळकर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभा समयी अर्चना संजय चौगुले यांनी मनोगत मांडले. समुदाय संघटिका रेश्मा चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक, अमर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार डॉ. ज्योती पाटील यांनी मानले.
विविध स्पर्धेतील विजेते
■टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे- मनीषा पाटील (प्रथम क्र.),
मंगल सुतार (द्वितीय क्र.),
पुनम राऊत (तृतीय क्र.),
धनश्री रणवरे आणि मेघा डेळेकर (उत्तेजनार्थ).
■सालाड तयार करणे –
अंजली आंबले (प्रथम क्र.),
उषा पोतदार (द्वितीय क्र.),
आशा एकल (तृतीय क्र.),
सुप्रिया सूर्यवंशी व अर्चना देवळे (उत्तेजनार्थ क्र.),
■ रांगोळी स्पर्धा-
उमा मंडी( प्रथम क्र.),
सुप्रिया सूर्यवंशी (द्वितीय क्र.),
शिवानी महाजन (तृतीय क्र.),
अश्विनी सुतार व अश्विनी वंडकर (उत्तेजनार्थ क्र.)