मुरगूड ( शशी दरेकर ) : देशाच्या जलक्रांतीत मोलाचे योगदान भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी दिले आहे . देशाच्या विकासात त्यांचा परीसस्पर्श झाला असून आजच्या पिढीला त्यांचे बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञान आदर्शवत आहे . असे प्रतिपादन मुरगूड -नगर परिषदेचे अभियंता प्रकाश पोतदार यांनी केले. मुरगुड येथील दि मुरगूड इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन तथा अभियंता दिन साजरा करण्यात आला. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पुजन मरगूड नगरपरिषदेचे अभियंता प्रकाश पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष विशाल सुर्यवंशी यांनी मुरगूड इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने नगर परिषदेने सुर्यवंशी कॉलनी येथील दिलेल्या रिकाम्या जागेत वृक्षारोपण व संवर्धन करण्यात येणार आहे. त्याच बरोबर या ठिकाणी विरंगुळा केंद्र निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी दि मुरगूड इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष विशाल सुर्यवंशी, उपाध्यक्ष आकाश दरेकर, सचिव विवेकानंद सुर्यवंशी, विशाल रामसे, सागर भोसले, संतोष पाटील, बाळासो सुर्यवंशी, प्रवीण दाभोळे, मयुर आंगज, आकाश आमते, राजाराम गोधडे,हर्षल अस्वले, अजिंक्य पाटील, शुभम भोसले, पुरषोत्तम देसाई, संदेश शेणवी, विक्रम घाटगे, ओंकार खराडे , संदीप किल्लेदार, प्रभू घुंगरे पाटील यांच्यासह इंजिनियर्स व कॉन्ट्रॅक्टर्स उपस्थित होते.