विक्रमसिंह घाटगे हे छत्रपती शाहू महाराज यांच्या केवळ रक्ताचेच नव्हे तर कर्तुत्वाचे व विचाराचे खरे वारसदार असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांनी केले.
व्हन्नूर ता.कागल येथील श्री.दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयात राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंती निमित्तच्या समारंभात ते बोलत होते.

श्री पोवार यांनी राजे विक्रमसिंह घाटगे यांनी बहुजन मुलांच्या शिक्षणासाठी राजेंनी राबवलेले विविध उपक्रम,साखर कारखानदारीतून शेतकऱ्यांना दिलेला उच्चांकित दर व बेरोजगारी सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि कुस्ती केलेला चालना याबाबत माहिती दिली या समारंभात जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धेचे व वक्तृत्व स्पर्धेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुहानी हेमंत कांबळे, भाऊसाहेब खाडे, प्रविण निकम यांची मनोगते झाली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जे. एन. सावंत यांनी केले. सूत्रसंचालन आर.व्ही..इंगवले यांनी केले, तर आभार बी.जी.बोराटे यांनी मानले.