कागल : आज 2 ऑक्टोंबर 2021 रोजी श्री महात्मा गांधी जयंती निमित्त कै.काँ. प्रवीण जाधव बालसंस्कार केंद्र, करनुर येथे गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधीजी, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली.
श्री अशोक शिरोळे यांनी थोर समाजसुधारक व व्यक्तींच्या जयंत्या का साजरा करतात याबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमांमध्ये गांधी अभ्यासक श्री सचिन घोरपडे,श्री विठ्ठल कांबळे व प्राचार्य श्री कराळे सर यांनी गांधीजींच्या जीवनावरील अनेक पैलूंची माहिती दिली .सदर कार्यक्रमात आदर्श शेतकरी म्हणून श्री जयसिंग घाटगे व श्री राजाराम पाटील,करनुर यांचा सत्कार करण्यात आला, तसेच कागल शहर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यपदी निवड झालेबद्दल श्री विक्रम चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार करनूरच्या मा. डे. सरपंच सौ अनिता अशोक शिरोळे यांनी मानले. सदर कार्यक्रमास काशिनाथ गारगोटे (वनमित्र अध्यक्ष) श्री नानासो बरकाळे, श्री राजेंद्र घोरपडे, श्री विजय इंगवले, श्री अक्षय चौगुले ,करनुर गावचे आत्माराम कांबळे, संदीप चौगुले, संजय आवळे, बाळकू चौगुले, ग्रामस्थ उपस्थित होते.