वडगाव नगरपरिषद प्रभाग आरक्षण सोडत जाहीर

पेठ वडगाव(सुहास घोदे): वडगाव नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे.

Advertisements

परिशिष्ट – १ नुसार जाहीर झालेल्या आरक्षणानुसार, वडगाव नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण गटासाठी महिला व पुरुषांसाठी जागांचे वाटप झाले आहे.

Advertisements

प्रभागनिहाय आरक्षणाची स्थिती खालीलप्रमाणे:

  • प्रभाग क्रमांक ०१:
  • जागा क्र. ०१ अ: नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
  • जागा क्र. ०१ ब: सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक ०२:
  • जागा क्र. ०२ अ: अनुसूचित जाती महिला
  • जागा क्र. ०२ ब: सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक ०३:
  • जागा क्र. ०३ अ: अनुसूचित जाती
  • जागा क्र. ०३ ब: सर्वसाधारण महिला
  • प्रभाग क्रमांक ०४:
  • जागा क्र. ०४ अ: सर्वसाधारण महिला
  • जागा क्र. ०४ ब: सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक ०५:
  • जागा क्र. ०५ अ: नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • जागा क्र. ०५ ब: सर्वसाधारण महिला
  • प्रभाग क्रमांक ०६:
  • जागा क्र. ०६ अ: सर्वसाधारण महिला
  • जागा क्र. ०६ ब: सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक ०७:
  • जागा क्र. ०७ अ: नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • जागा क्र. ०७ ब: सर्वसाधारण महिला
  • प्रभाग क्रमांक ०८:
  • जागा क्र. ०८ अ: नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
  • जागा क्र. ०८ ब: सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक ०९:
  • जागा क्र. ०९ अ: नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
  • जागा क्र. ०९ ब: सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक १०:
  • जागा क्र. १० अ: अनुसूचित जाती महिला
  • जागा क्र. १० ब: सर्वसाधारण

या आरक्षण सोडतीमुळे निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग येणार असून, इच्छूक उमेदवारांनी आपल्या तयारीला सुरुवात केल्याचे दिसत आहे. ही सोडत वडगाव नगरपरिषद वडगाव येथील मुख्याधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!