साके(सागर लोहार) : कागल – निढोरी राज्यमार्गावर वाघजाई घाट व्हनाळी – गोरंबे ता.कागल एम.एम.जी गोठ्याजवळ धोकादायक वळणावर झालेल्या तिहेरी अपघातात दोन ठार तर सहा जण जखमी झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाघजाई घाटातील एम. एम. जी गोठ्या जवळ असलेल्या धोकादाय वळणावर रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कागलकडे निघालेल्या छोटा हत्ती, त्यामागे टू व्हिलर व त्यामागे बुलेरो गाडी कागलच्या दिशेने जात असताना समोरून शेंडूर कडून निढोरीच्या दिशेने येणा-या ऊसाच्या टॅ्रक्टर ची पाठीमागील ट्राॅली धोकादायक वळणावर समोरून येणा-या छोटाहत्ती, वाहनावर पलटी झाली.
यावेळी झालेल्या तिहेरी आपघातात छोटा हत्तीमधील महिला हिराबाई महादेव माने (वय 75 ) सिद्धनेर्ली ता.कागल व टू व्हिलर वरील दिक्षांत नितीन कांबळे (वय 28) शहापूर, इचलकरंजी हे दोघे जागीच ठार तर इतर 6 जन जखमी झाले.
जखमींवर कागल व कोल्हापूर येथील शासकीय रूगणालयात उपचार सूरू आहेत. आपघात घडलेल्या ठिकाणी ऊस रस्त्यावर पडल्यामुळे वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्याने सुमारे तासभर वाहतुक ठप्प झाली. तसेच अपघात ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर कागलचे पोलिस आणि पोलिस कंट्रोल 112 चे पोलिस पोहचल्याने ऊस बाजूला करून वाहतुक पुर्ववत करण्यात आली. कागल शासकीय रूग्णालयाबाहेर नातेवाईंकानी मोठी गर्दी केली होती. सदर आपघाताची कागल पोलिसात रात्री उशिरा नोदं करण्याचे काम सुरू होते.
उच्चशिक्षित तरूणाचा आपघाती मृत्यू…..
मयत दिक्षांत कांबळे वय 27 हा अविवाहित असून त्याने इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण करून एका खासगी कंपनीत नोकरीला होता. त्याच्या पश्चात आई वडिल आणि एक भाऊ असा परिवार आहे. कर्ता युवकाचा मृत्यू झाल्याने कुटूंबियाबरोबर गावावर शोककळा पसरली आहे.
आपघातातील जखमींची नावे अशी 1) लक्ष्मण भुर्ले वय 65 , 2)छबू चंदुकुडे वय 50, 3) बबीता भुर्ले वय 53, 4) सैाजन्या भुर्ले वय 11,5)अनिल शिंदे वय 36, 6) लताबाई भुर्ले वय 65
देवदर्शनाहून येताना आपघात….
अनिल भिवाजी शिंदे हा कागल येथील नगपालिकेच्या घंटागाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करूत होता. त्याने नुकताच नवीन छोटा हत्ती टेंपे घेतला होता. नवीन टेंपो घेवून तो नातेवाईकासह बाळूमामा देवदर्शनासाठी गेला होता दर्शन घेवून घरी कागलकडे येत असताना वाघजाई घाटात त्यांच्या टेंपोचा अपघात होवून नवीन टेंपोचा चक्काचूरा झाला.