दहा सेंटिमीटर कापड घालणारा जन्माला येईल ……
मुरगूड ( शशी दरेकर ) :मुरगूडात येथील अंबाबाई मंदिरात दसरा निमित्य तुकाराम पुजारी यांची भाकणुक झाली यावेळी भावीकाची मोठी गर्दी झाली होती, तुकाराम पुजारी यांनी केलेली भाकणुक पुढीलप्रमाणे
मुरगूड हे गाव गिजेवाडी हाया. बागेच्याओढ्याला माझी विश्रांती हाया चाफ्याच्या बागेत माझी महत्वेश्वर गादी हाया करवंदीच्या जाळीत आनं कांबळ्याच्या खोळत प्रूत्वीची घडामोड करीत बसलो हाया
कोल्हापूरच्या देवीला संकट पडलय…. वांग्याच्या झाडाला शिडी लावशिला
….. *दहा सेंटिमीटर कापड घालणारा माणूस ह्या देशात जन्माला येईल…… धर्माचा पाऊस… कर्माचं पीक होईल….. उन्हाळ्याचा पावसाळा अन पावसाळा उन्हाळा होईल….. कलियुगात बारा बैलं उफराठी फिरताहेत….. धरतीमाता शेशाच्या फडीवर उभी हाय, ती डळमळू लागली आहे…… जगात मेघ, बसवा आणि कुणबी अशी तीन राज्ये आहेत….. कुणब्याच्या बाळाला आशीर्वाद आहे….. जगात डोंगराएवढे पाप अन दोऱ्याएवढं पुण्य शिल्लक आहे. धरती मातेवर जास्त पापाचं ओझं झालय….. . डोंगर पर्वत वाफेन उडून जातील….. नदीचा माळ अन माळाची नदी व्हईल. धर्माचं पारडं गंमत बघतयं, कर्माचं पारडं खेळ बघतयं….. माणसानं पाची बोटांनी धर्म कराव…. गर्वान वागशीला तर यमपूरी बघशीला…… सत्यानं वागशीला तर दोन घास सुखानं खाशीला…. माझी विटंबना करशीला तर मातीत जाशीला…… गीजेवाडी गावाचच नाव मुरगूड झालंय. पांढरीची राखण करीन बाबा…….. सत्यानं वागा… दान धर्म करा…
सुखानं अन् एकोप्यानं -हावा…..
श्रीक्षेत्र मुरगूड येथे श्री बिरदेव अंबाबाई भाकणूक *तुकाराम बाबुराव पुजारी* महाराज यांची भाकणुक गेली अठरा वर्षे हे भाकणूक सांगतात .आजोबा तुकाराम यांच्यानंतर नातू तुकाराम हे भाकणूक सांगतात .कोंडीबा पणजोबा पासून भाकणूक सांगण्याचा वारसा ते जपत आहेत. त्यांना सागर बोते व सिद्धू मेटकर आणि समस्त धनगर समाजाने ढोलाच्या गजरात साथ -सोबत दिली. भंडाऱ्याची उधळणील झालेली ही ओवीबद्ध भाकणूक ऐकण्यासाठी मुरगूड शहरासह परिसरातील भाविक गावचे पाटील, मानकरी,
रयत,नवरातकरी गुरव,व ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते….
देवीची जागरण ढोल ताशा कैचाळ . वाजवून तर लेझिम क॑रड्याच्या तालावर,तर महीलानी म्हटलेल्या ओव्यातुन रात्रभर जागरण झाली