गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : राष्ट्रीय महामार्गावर कागलहून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या आले वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला आज गोकुळ शिरगाव येथील जैन मंदिरासमोर अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गावरून बाजूला घेत असताना अचानक ट्रक घसरून पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, किरकोळ नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक आल्ले घेऊन जात होता. गोकुळ शिरगाव येथील जैन मंदिरासमोरून जात असताना चालकाने राष्ट्रीय महामार्गावरून बाजूला घेताना मात्र, काही कारणास्तव ट्रक सर्विस रोडवर घसरला आणि पलटी झाला. अपघातानंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.

या अपघातात ट्रकला किरकोळ नुकसान झाले असून, अल्ल्याची पोती ट्रक मधून काही बाहेर पडलीत. काही काळ वाहतूक देखील विस्कळीत झाली. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. उशिरापर्यंत या घटनेची गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नव्हती.