बातमी

सुरुपलीच्या हनुमान सेवा संस्थेत सत्तांतर

विरोधी गटाचे १० उमेदवार विजयी तर सत्ताधारी गटाला केवळ २ जागावर विजय

मुरगूड ता. १९ (प्रतिनिधी) : सुरुपली ता.कागल येथील हनुमान सेवा सोसायटीच्या अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणूकीत रंगराव पाटील, एस. आर. बाईत, राजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखालील श्री भावेश्वरी शेतकरी विकास आघाडीने १२ पैकी १० जागावर विजय मिळवत संस्थेत सतांतर घडवले सत्ताधारी गटाला केवळ दोन जागावर समाधान मानावे लागले या निवडणूकीकडे कागल तालुक्याचे लक्ष लागले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एम. वळवी यांनी काम पाहिले.

सुरुपती येथे हनुमान सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूकीचे मतदान व मतमोजणी किरकोळ बाचाबाची वगळता शांततेत आज पार पडली. संस्थेचे ६५९ एकूण सभासद मतदानास पात्र होते त्यापैकी ६३८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

यामध्ये २६ मते अवैध ठरली तर ६३८ मते पात्र ठरली आहेत निवडून आलेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात सर्वसाधारण खातेदार गट रंगराव विठ्ठल पाटील (३४५) बाळासो भाऊ खापरे, (३५०), प्रकाश साताप्पा डाफळे (३३६), मारुती दत्तू डाफळे (२३१). रंगराव पांडूरंग नादवडेकर (३०६), निवास महादेव पाटील (३१९), पांडूरंग जोतीराम पाटील (३१२), महिला गट- सौ. विमल निवृती पाटील (३२३) शालन आनंदराव मोरे (३६४), अनुसूचित जाती जमाती गट-गौतम वसंत कांबळे (३३७)तर सताधारी गटाचे दोन विजयी उमेदवार असे विजय पांडूरंग डाफळे (३०१) विश्वनाथ मल्लापा खंदारे (३२३)

या विजयाबध्दल प्रतिक्रिया देताना रंगराव पाटील म्हणाले सताधाऱ्यांनी तब्बल १२५ मते वाढवून देखील सभादांनी आमच्या पॅनेलला कौल दिला सभासदांच्या हिताचा कारभार करण्यास आमचे प्राधान्य असेल असे सांगितले मतदान आणि मतमोजणीवेळी मुरगूड पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निकाल जाहीर होताच भावेश्वरी शेतकरी विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण व्र फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *