मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगुड नगरपालिकेने दर अमावस्याला मुरगूड हद्दीत फिरतं शौचालय व पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्यात यावा अमावस्येला आदमापुर येथे बाळूमामा देवालयाची मोठी यात्रा भरते.दूर दूर हून भाविक येत असतात.सर्वांना हॉटेल किंवा निवासस्थाने उपलब्ध होऊ शकत नाहीत.यातील नव्वद टक्के भाविकांची आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नसते.
अमावस्या यात्रे त्यांचा मुक्काम मंदिर.परिसर किंवा रस्त्या कडेला देखील असतो अशा वेळी त्यांना स्नान व प्रातर्विधी साठी स्वच्छता गृहे व फिरत्या शौचालयाची व्यवस्था करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महिला वर्गाची फारच कुचंबणा होते मुरगूड पासून यमगे पर्यंत वाहनाच्या रांगा व वर्दळ असते.प्रातर्विधी साठी उसाच्या फडाचा आडोसा भक्तांना शोधावा लागतो. आंघोळीला सुध्दा पैसे मोजावे लागतात.
मुरगूड नगरपरिषदेकडे फिरती शौचालये आहेत.सद्या ती वापरत नसतील तर ठराविक आकार घेऊन भाविकांना उपलब्ध करून द्यावीत असे मत मुरगूड चे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी मुख्य अधिकारी यांना व्यक्त केले आहे.
तसेच आदमापूर देवालय व्यवस्थापनाने सुध्दा याची गांभीर्याने दखल घ्यावी.
या वेळी राजेंद्र चव्हाण पांडुरंग कुंडवे ,अनिल अर्जुने, अमर चौगले,विजय राजीगरे,संग्राम साळुंखे, राजेंद्र सावंत फौजी , संतोष तेली, गणेश डोंगरे, दयानंद लुगडे, ओंकार वंडकर,सुरज मुसळे, कुणाल क्षीरसागर, स्वप्निल शिंदे, सदाशिव जाधव रामचंद्र बोते, विशाल आरडे सतिश सुर्यवंशी, सुनील कापसे ,आदी उपस्थित होते