कागल : येथील प्रसिद्ध श्री गहिनीनाथ गैबीपीर उरुस सालाबादप्रमाणे होणार आशून याच्या धार्मिक विधीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. कागल येथील शाहू नगर वाचनालय येथे पार पडलेल्या उरूस कमिटीच्या मिटिंग मध्ये पुढील धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा देण्यात आली. यावेळी कागल नगरपरिषद मुख्याधिकारी पावन म्हेत्रे, प्रताप उर्फ भैय्या माने, प्रकाश गाडेकर, रमेश माळी, प्रवीण काळबर, सम्राट सणगर, उरूस कमिटीचे राजेंद्र जाधव, राजू पाटील, आबा हावलदार, हिंदुराव पाटील, जिंदत चौगुले, अस्लम मुजावर, महेश घाटगे, बंडोपंत वाळवेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मंगळवार दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. गैबी दर्ग्यावर पांढरे निशान बांधणे. रविवार दि. ५ नोव्हेंबर सकाळी १० वा. गैबी दर्ग्यात काडणी बांधणे, सोमवार दि १२ नोव्हेंबर सकाळी १२ वा. दुधगंगा नदीतून पाणी आणून देवास स्नान घालणे, मंगळवार १४ नोव्हेंबर सकाळी १० वा. रात्री गंधरात्र, बुधवार १५ नोव्हेंबर रात्री १२ वा. पहिला गलेफ अर्पण करणे, गुरुवार १६ नोव्हेंबर रात्री १ वा. दुसरा गलेफ अर्पण करणे, शुक्रवार १६ नोव्हेंबर रात्री १ वा. तिसरा गलेफ अर्पण करणे, शनिवार १८ नोव्हेंबर पहाटे ३ वा. उरुसाचा मुख्य दिवस चौथा गलेफ अर्पण करणे, रविवार १९ नोव्हेंबर रात्री ८ वा. उरुसाचा शेवटचा दिवस पाचवा गलेफ अर्पण करणे, सोमवार २० नोव्हेंबर सकाळी ६ वा. उरुसाची सांगता काडणी सोडवणे.
जोरदार चर्चा
गैबी पीर दर्ग्यात विविध धर्माचे लोक भक्तिभावाने येत असतात. पण दर्ग्यात गंडे, दोरे, ताईत व कुलुपे हे खिडक्यांना लावली जातात. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. याबाबत या मिटिंग मध्ये गरमागरम चर्चा झाली. म्हणून असे प्रकार करून दर्ग्याला विशिष्ट धार्मिक केंद्र बनवू नये असे आवाहन करीत कागल नगरपरिषदेने लोकभावनेचा विचार करीत यापुढे दर्ग्यात गंडे, दोरे, ताईत व कुलुपे लावू नयेत असे सांगितले आहे.