गणेश नागरी पतसंस्थेचा आर्थिक वर्षात २ कोटी ३५ लाखावर नफा तर वार्षिक उलाढाल ६७४ कोटी

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथील श्री. गणेश नागरी सहकारी पत संस्था मर्या. मुरगड येथील अग्रगण्य समजल्या जाणा-या या संस्थेला २०२२/२३ या आर्थिक वर्षात निव्वळ नफा २ कोटी ३५ लाख रुपये इतका झाला असुन आर्थिक वर्षात एकुण व्यवसाय ६७४ कोटी इतका झालेला आहे. तसेच संस्थेने १०० कोटी ठेवीचा टप्पा ओलांडला आहे संस्थेने अल्पावधीतच गरुड भरारी घेऊन मुरगूड पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक आर्दश निर्माण केलेला आहे. या पुढेही संस्थेची अशीच भरभराटी होईल अशी ग्वाही संस्थेचे चेअरमन श्री.उदयकुमार शहा यांनी दिली.

Advertisements

चेअरमन श्री.उदयकुमार शहा, व्हा . चेअरमन श्री . प्रकाश हावळ व संचालक एकनाथ पोतदार तसेच इतर संचालकांनी, सेवकांनी केलेल्या १०० कोटी ठेवीच्या उद्दिष्ट पूर्ती केलेबद्दल, कार्यकारी संचालक श्री. राहुल शिंदे व सर्व सेवकांचे अगदी मनापासून कौतुक केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संचालक मंडळाने सेवकांनी केलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Advertisements

सदर संस्थेला सन २०२२ / २०२३ सालामध्ये दैनिक सकाळ पुरस्कृत आवडॉलस् ऑफ महाराष्ट्र, ब्रॅण्डस् ऑफ कोल्हापूर या पुरस्काराने सन्मानित करणेत आले तसेच नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगाव यांचा महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्याचा आतरराज्य पुरस्काराने सन्मानित करणेत आले आहे .सदरचे मिळालेले पुरस्कार हे संस्थेने केलेल्या कामाची पोच पावती आहे.

Advertisements

स्वर्गीय खासदार श्री. सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या आशीवादाने ही संस्था दि.३१/३/१९८९ इ.रोजी स्थापन झाली अवघ्या ३५ वर्षात या संस्थेचा रोपटयाचे-वटवृक्षात रुपांतर होऊन लाखो लोकांचे जीवनमान सुधारणे साठी या संस्थेचा हातभार लागला आहे. तसेच खासदार श्री. संजयदादा मंडलिक यांच्या मार्गदर्शनखालो दिवसेंदिवस या संस्थेने प्रगती पथाकडे वाटचाल केली आहे.

संस्थेने चालु आर्थिक वर्षांपासुन आधुनिकतेचे पाऊल पुढे टाकत असताना आपल्या ग्राहकानों कोअर बँकींग सेवा उपलब्ध करुन देत RTGS, NEFT, IMPS QR CODE या सारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे संस्थेने दिलेल्या सेवा व सोयीमुळे व संस्थेच्या सेवकांनी दिलेल्या विन्रम सेवेबद्दल सर्व स्तरावर कौतुक होत आहे.३१/०३/२०१३ अखेरची संस्थेची सांपत्तिक स्थिती खालीलप्रमाणे

  • वसुल भागभांडवल ३९ लाख ९० हजार
  • राखीव व इतर निधी ७ कोटी ५८ लाख
  • ठेवी १०० कोटी १४ लाख
  • कर्ज ७८ कोटी १२ लाख (पैकी सोनेतारण २६ कोटी ६२ लाख)
  • गुंतवणुक ३४ कोटी २६ लाख
  • खेळते भांडवल ११९ कोटी ८७ लाख
  • निव्वळ नफा २ कोटी ३५ लाख
  • एकुण व्यवहार ६७४ कोटी ०४ लाख
  • थकबाकी ०.२७ टक्के
  • ऑडीट वर्ग अ (मार्च २०२२)
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!
PM Kisan 20 वीं किस्त: कब और कैसे पाएं ₹2000? India’s Hottest Picks: Top 10 Trending Stocks of 2025! जागतिक वन दिन 2025 Book HSRP Plate Process Step by Step kagal vidhansabha voting 2024