कागल (विक्रांत कोरे) : कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे परप्रांतीच्या झालेल्या खुनाचा छडा अवघ्या 36 तासात पोलिसांनी लावला. हा खून तारीख 14 सप्टेंबर रोजी झाला होता. मयताच्या पगाराची रक्कम केवळ चैनीसाठी व लुबाडण्यासाठी त्याला निर्जनस्थळी नेऊन त्यास दारू पाजुन डोक्यात दगड घालून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
आदिनाथ मारुती लोखंडे वय वर्षे 22 राहणार कसबा सांगाव ,सुहास बाळासाहेब बिरांजे वय वर्षे 34 राहणार कसबा सांगाव, या आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी चांगल्याच आवळल्या .खुनासाठी वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढणे पोलिसांना लवकर शक्य झाले .विकाससिंह गोपीसिंह वय 24 राहणार ,ग्राम सिल्वर, पोस्ट झिजवार तालुका जेसीपी मध्य प्रदेश असे मयत इसमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून कसबा सांगाव तालुका कागल येथील मगदूम मळ्याजवळ झाडीत पुरुष जातीचा मृतदेह रक्ताच्या थराळ्यात पडलेल्या अवस्थेत सापडला . अज्ञात इसमाच्या डोक्यात दगड घालून चेहरा विद्रूप केला होता. त्यामुळे मयताची ओळख पटत नव्हती .खून झालेली व्यक्ती ही पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सुदर्शन जीन्स या कंपनीत बॉयलर विभागात कामगार असल्याची ओळख पोलिसांना पटली.
मयत बिकास सिंह यांचा नुकताच पगार झाला होता त्याच्याकडील सर्व रक्कम आरोपींनी काढून घेतली या रकमेतून सर्वांनी नशा पण केले व सदरची काढून घेतलेले रक्कम बिकासिंह कोणाला तरी सांगणार म्हणून त्याला निर्जन स्थळी कसबा सांगाव चे हद्दीत मगदूम मळ्याजवळ नेले. त्याच्या डोक्यात दगड घालून डोक्याचा चेंदामेंदा केला. ओळखू नये म्हणून चेहरा विद्रूप केला. त्याच्या पायाला नायलॉन पट्टीने बांधून त्यास फरफटत नेले व झुडपात नेऊन टाकले.
गोपनीय माहितीचे आधारे व सीसीटीव्ही फुटेज द्वारे पोलीस अंमलदार राजू कांबळे व अशोक पवार यांना माहिती मिळाली आरोपी हे कसवा सांगावाचे असल्याचे तपासात समजले .स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या मदतीने कागल पोलिसांनी आरोपींच्या मुस्क्या लागलीच आवळल्या.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर, कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, जालिंदर जाधव, अशोक पवार, वसंत पिंगळे, राम कोळी, अमित सर्जे, अमित मर्दाने, कृष्णात पिंगळे, राजू कांबळे, राजू एडगे यांनी या प्रकरणाचा छडा लावला.