मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता , कागल ) येथिल हुतात्मा स्मारक नाका नं.१ जवळील ” लिटल मास्टर गुरुकुलम् ” शाळेच्या पटांगणात चिमुकल्यानी बाजार भरविला होता. पालकानी व परिसरातील नागरीकानीं चिमुकल्याच्या बाजाराला उदंड प्रतिसाद दिला. चिमुकल्यानी या बाजारामध्ये भडंग, कुरकुरे, वेफर्स, चिरमुरे, फुटाणे, शेगदाणे, खारीडाळ, चॉकलेट, कॅडबरी, राजिगरे लाडू, चिरमुरे लाडू अशा अनेक खाऊ पदार्थासह सोलकडी, सरबत अशी थंडपेये सुध्दा ठेवली होती. त्याचबरोबर खेळणी यासह मेथीची भाजी, बावची, वांगी, पोकळा, कोथंबिर अशा अनेक प्रकारच्या भाज्या चिमुकल्यांच्या बाजारात उपलब्ध होत्या. ग्राहकानी या बाजारात खरेदी करून चांगला प्रतिसाद दिला.
शिक्षणाबरोबरच समाजातील व्यावसाईक घडामोडी बालमनांवर रुजाव्यात हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन या चिमुकल्यांच्या बाजाराचे आयोजन केले होते. असे शाळेचे अध्यक्ष श्री. सुभाष अनावकर यानीं सांगितले. या चिमुकल्यांचा बाजार यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापिका सुमन अनावकर, सौ , सिंधू कोंडेकर, सौ. सरिता रनवरे, सौ. वर्षा पाटील, सौ. रश्मी सावंत, सौ. ज्योती डवरी, सौ. प्रिया कामत, सौ. अर्पणा माने, सौ. संचली साळोखे, कु. धनश्री कांबळे, श्री. सुतार (सर ) यानी परिश्रम घेतले.