सद्गुरू बाळूमामाचा जन्मसोहळ उत्साहात संपन्न

मडिगले(जोतिराम पोवार) : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा राज्यातील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामा यांचा १२९ वा जन्मकाळ सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. बाळुमामांच्या नावाने चांगभलच्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत ढोल कैताळाच्या गगनभेदी आवाजात, भंडा-याच्या मुक्तहस्ते उधळणित हा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला.

Advertisements

बाळूमामाच्या जन्म काळ उत्सवासाठी विस्तार महिन्याच्या कालावधीत भावीकांनी मोठी गर्दी केली होती. बाळूमामा मंदिरामध्ये गाभाऱ्यात समाधीस्थळ व मुर्तीची जरबेरा फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. बाळूमामांचा पाळणा झेंडूच्या व जरबेरा फुलांनी सजवला होता. संपूर्ण मंदिर व कळसावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

Advertisements

आदमापूर येथील ह.भ.प.नानासाहेब पाटील यांचे दुपारी यांचे कीर्तन झाले. काकड आरती, अभिषेक, समाधीचे पुजन आदी धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर दुपारी ४ वा. २३ मिनिटांनी श्रीं चा जन्मकाळ सोहळा संप्पन्न झाला. यावेळी श्री च्या पाळण्यावर भाविकांनी फुलांचा वर्षाव केला. सुहासिनींनी पाळणा पुजन केले. तसेच पाळणा गीत गाईले. यावेळी भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

Advertisements

सर्व भाविकांनी बाळूमामांचे व पाळण्याचे दर्शन घेण्यासाठी आणि फूले वाहण्यासाठी गर्दी केली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. सुटंवडा वाटण्यात आला. तसेच बाळूमामांचे निर्वाणस्थळ श्री. मरगुबाई मंदिरामधून जन्म समाधी स्थळी श्रींच्या अश्वासह भंडारा आणून श्रीं चा पालखी सोहळा झाला. भाविकांनी व सुवासिनींनी पालखीचे व अश्वाचे स्वागत केले.

यावेळी बाळूमामा देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, अध्यक्ष धैर्यशील भोसले, देवस्थानचे पदाधिकारी, बाळूमामा फौंडेशनचे अध्यक्ष व सरपंच विजयराव गुरव, बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय तुकाराम पाटील,गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे,ग्रामसेवक डी.बी.माने
एल.जी.पाटील,पी.एल.पाटील,साताप्पा पाटील,प्रकाश खापरे ,पदाधिकारी,भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!