मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगुड_ता . कागल येथील सरपिराजीराव सहकारी गुळ उत्पादक सोसायटी लिमिटेड मुरगुड या संस्थेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी सकाळी ११:०० वा संस्थेच्या कार्यालयामध्ये पार पडली.या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तसेच शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे होते.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन रामचंद्र खराडे यांनी स्वागत केले. संस्थेचे सचिव दगडू माळी यांनी अहवाल वाचन केले .श्रीमंत समरजितसिंह घाटगे यांनी सभेस मार्गदर्शन केले. तर संस्थेचे संचालक हिंदुराव कृष्णात किल्लेदार यांनी आभार मानले.
यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन दत्तामामा खराडे सर, पिराजीराव पतसंस्था मुरगुडचे चेअरमन मनोहर आवटे यांचेसह संस्थेचे विद्यमान संचालक दत्तात्रय जालीमसर , पांडुरंग पाटील, सुरेश कांबळे ,श्रीमती आनंदी सावंत, श्रीमती तानुबाई वारके व इतर सर्व सभासद वर्ग उपस्थित होता.