मुरगूड ( शशी दरेकर ) : संस्थेंचे जेष्ठ सभासद पांडूरंग चांदेकर यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथराव पाटील (आण्णाजी) यांच्या फोटोला पुष्पहार घालून सभेस प्रारंभ झाला. यावेळी संस्थेचे चेअरमन प्रविणसिंह पाटील (दादा),व्हा चेअरमन वसंतराव शिंदे व सर्व संचालक उपस्थित होते.सभेचे स्वागत व प्रास्ताविक चेअरमन प्रविणसिंह पाटील (दादा) यांनी केले.यावेळी सचिव सुधीर मोहीते यांनी विविध विषयाचे वाचन केले.सभेला सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.अनेक सभासदांनी आपले प्रश्न मांडले त्यावर चेअरमन,व्हा.चेअरमन व सचिवांनी त्यांना समाधानकारक उत्तरे दिली.सर्व विषय संस्थेस वार्षिक सालातील एकूण नफा रू. २.६८ (रक्कम लाखात) रू असून लाभांश १२% व दिपावली रिबेट जाहीर केला.
सभेस मुरगूड बॅंकेचे मॅनेंजर विश्वास चौगले, आनंदराव कल्याणकर, पांडूरंग गायकवाड, बाळासोा आंगज, विठ्ठल भारमल, रघुनाथ सुर्यवंशी, गणपती बारड, राहूल वंडकर, नामदेवराव भांदीगरे,संजय मोरबाळे,राजेंद्र आमते,सुधीर सावर्डेकर,,राजू चव्हाण आदींनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चेत भाग घेतला.
यावेळी विजय शेट्टी , रमेश मोरबाळे,बाळासो आंगज,राजेंद्र नलवडे, राजू जाधव ,विजय मेंडके,सुरेश शिंदे, रणजित मगदूम हे सभासद उपस्थित होते.सभेचे आभार व्हा.चेअरमन वसंतराव शिंदे यांनी केले.