शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी के .डी .पाटील सर अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन (इमसा) यांचा सत्कार

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) :

Advertisements

शिक्षक संघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी गोकुळ शिरगाव येथील सौ. आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजचे संस्थापक-अध्यक्ष के. डी. पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी कोल्हापूर जिल्हा इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनच्या (इमसा) अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Advertisements


याप्रसंगी आमदार आसगावकर यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. पाटील आणि इमसाच्या पदाधिकाऱ्यांनी आसगावकर यांच्या पुढील राजकीय आणि शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान, जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांसमोरील विविध शैक्षणिक समस्या आणि आव्हानांवरही चर्चा झाली. शिक्षकांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी काम करण्याचे आश्वासन आमदार आसगावकर यांनी यावेळी दिले.

Advertisements


ही भेट सदिच्छा असली तरी, ती शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींमधील समन्वय आणि भविष्यातील कामांची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!