सुळकूड( प्रा.सुरेश डोणे) : कोगील बुद्रक (ता.करवीर) येथे श्री.स्वामी समर्थ भक्त मंडळ यांच्या वतीने श्री.स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अमृतानंदजी महाराज (जंगली महाराज आश्रम, गोरंबे.) यांच्या हस्ते तसेच उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले. यावेळी अमृतानंदजी महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अमृतानंदजी महाराज म्हणाले की, जीवनामध्ये भक्ती मार्गाचे स्थान अनन्य महत्त्वाचे आहे. जीवन जर स्थिर रहायचे असेल तर भक्ती शिवाय तरणोपाय नाही.आज धावपळीच्या युगामध्ये सुख, शांती, समाधान मिळवण्यासाठी भक्ती मार्गाची गरज आहे. यावेळी श्री.स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी श्री. विठू माऊली भजनी मंडळ म्हाळुंगे यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आर.आर.पाटील सर, तेजस्विनी जाधव, बाळकृष्ण खोत सर, धनाजी बनकर (सामाजिक कार्यकर्ते), सचिन गुडाळे, राजू घराळ (सामाजिक कार्यकर्ते),रोहित गुडाळे,शुभम सुतार, मनोज चौगुले, संतोष माने,विश्वास गणेशाचार्य,बाजीराव गणेशाचार्य, रघुनाथ बामणकर,रघुनाथ बनकर, शहाजी मोहिते,विकास गवळी,प्रेम घराळ, विशाल पाटील,निवास पाटील,निलेश गुडाळे,संदिप गणेशाचार्य,शाहू गणेशाचार्य,उत्तम उपलाने त्याचबरोबर क्लासमेट बॉईज,विरभद्र तरुण मंडळ,माळवाडी मित्र मंडळ,जनसेवा फौंडेशन तसेच ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
स्वामीभक्त महादेव जाधव यांचे स्वप्न अपुरे…….
कोगील बुद्रक या गावातील स्वामीभक्त महादेव श्रीपती जाधव यांनी गेली दहा वर्षे स्वामी समर्थ प्रकट दिन कार्यक्रम त्याचबरोबर गावातील भाविक भक्तांना अक्कलकोट येथील स्वामींचे दर्शन आदी उपक्रम भक्ती भवाने पूर्ण केले. आपल्या गावामध्ये स्वामीं समर्थांचे अतिशय सुंदर मंदिर बांधण्यात यावे ही त्यांची मनोकामना होती त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न ही केले पण काही दिवसापूर्वीच त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांचे स्वामी समर्थांचे मंदिर बांधण्याचे स्वप्न अपुरे राहिले. पण त्यांचा परिवार व श्री. स्वामी समर्थ भक्त मंडळ व ग्रामस्थ यांनी महादेव जाधव यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरविले आहे