मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा कला शाखेचा विद्यार्थी सुमित जितेंद्र रेपे यांने अमरावतीच्या विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्षाखालील वयोगटामध्ये ५२ कि. वजनगटात तृतीय क्रमांक पटकावला.
राज्याच्या सर्व विभागातून आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धकांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीतून सुमितने हे यश कमावले. या यशाबद्दल त्याचा शिवराज ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राचार्य पी. डी. माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा शिक्षक प्रा. रविंद्र शिंदे यांनी सुमितच्या कामगिरीचे कौतुक केले. उपप्राचार्य एल्. व्ही. शर्मा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. बी. डी. चौगले यांनी आभार मानले.

सुमितला संदीप पाटील, शुभम कांबळे, विठ्ठल पाटील (गंगापूर ता. भुदरगड) यांचे मार्गदर्शन तर संस्था सेक्रेटरी खासदार संजय मंडलिक, विश्वस्त वीरेंद्र मंडलिक, प्राचार्य पी. डी. माने, उपप्राचार्य एल. व्ही. शर्मा, क्रीडाशिक्षक प्रा. रवींद्र शिंदे, एकनाथ आरडे, वर्गशिक्षक प्रा. प्रकाश डवरी, आण्णासो थोरवत यांचे प्रोत्साहन लाभले.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?