कागल(विक्रांत कोरे) : विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळाकडे ही करीयरच्या दृष्टीने पहावे, सध्या आधुनिक आणि स्पर्धेचे तंत्रज्ञानाची युग आले आहे त्यामुळे जीवनशैलीही बदलली आहे, मुलांनी दररोज लवकर उठले पाहिजे दररोज व्यायाम करून शरीर यष्टी कमली पाहिजे, असे प्रतिपादन करवीर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव यांनी केले.
गोकुळ शिरगाव( ता. करवीर) येथील सौ आंबूबाई पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे इंग्लिश मिडीयम स्कूल असोसिएशन(इम्सा) इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संघटने मार्फत जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी एक जानेवारी पासून क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये जिल्हास्तरीय कब्बडी, कॅरम, चेस स्पर्धांचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती मंगल पाटील,गोकुळ चे संचालक प्रकाश पाटील, शाहू साखर चे संचालक शिवाजीराव पाटील, टी.के.पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इम्सा चे संस्थापक महेश पोळ, अध्यक्ष गणेश नायकुडे, कार्याध्यक्ष प्राचार्य के. डी. पाटील, खजिनदार नितीन पाटील, कोल्हापूर शहर अध्यक्ष अमर सरनाईक, क्रीडा विभाग प्रमुख सचिन नाईक, शिवलिंग कलंत्रे, मुख्याध्यापिका एस. के. पाटील,आदीसह मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या २००शाळांनी सहभाग नोंदवला. या मध्ये सुमारे १५०० विद्यार्थ्यांसह शिक्षक, क्रीडाशिक्षक उपस्थित होते.