मुरगूड ( शशी दरेकर ):
बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. आज या सणाचे औचित्य साधून शिवराज विद्यालय मुरगूडच्या हरित सेनेच्या विद्यार्थिनींनी मुरगूड पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधनसणाचा सण उत्साहात साजरा केला . पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे अशक्य असते. आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. समाजासाठी आपल्या भूमिका बजावताना अनेकदा पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे शक्य होत नाही. अनेक सणवार त्यांना कुटुंबियांसोबत साजरे देखील करता येत नाहीत दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक पोलीस ट्यूटीवर असल्याने गावाकडे असलेल्या बहिणीला भेटून सण साजरा करू शकत नाहीत.


शिवराजचे प्र.प्राचार्य व्ही.बी. खंदारे यांच्या संकल्पनेतून व निसर्गमित्र पर्यवेक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक ८ रोजी पोलीस बांधवांसाठी रक्षाबंधन हा उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोलीस बांधवांना बांधण्यात आल्या. विद्यार्थिनींनी राखी बांधल्याने सर्वच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी भारावले . शिवराज विद्यालयाच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. यावेळी मुरगुडचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे, सहा .पीएसआय प्रशांत गोजारे,पोलीस उपनिरीक्षक व सर्व पोलीस अंमलदार, शिक्षक आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.