बौद्ध समाजाच्या शेतजमिनी वरील हस्तक्षेप थांबवावे मौजे केंबळी येथील बौद्ध समाजाचे निवेदन

कागल : मौजे केंबळी येथील गट नं. 102 या शेतजमिनी समाजाच्या सामाईक वाहिवाटीसाठी असून सदर शेतजमिनी या बौद्ध रहिवाशी कसत असून या शेत जमिनीच्या काही भाग मुस्लिम समाजाच्या दफन भूमीसाठी दिलेला आहे, तसेच काही भाग सरकारी गायराणामध्ये येतो तरी सध्या रीतसर सरकारी मोजणी करण्याचे ठरले असून सदर गट नं १०२ मध्ये असणाऱ्या बौद्ध समाजच्या शेतजमीन मध्ये कोणत्याही अधिकारीने खुलासा न देता यात शिरकाव करत आहेत तरी सदर शेतजमिनी मध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप बौद्ध समाज खपवून घेणार नाही तसेच नवीन गट मोजणी आम्हास मान्य नाही तरी पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार गट मोजणी व्हावी.

Advertisements

अन्यथा मौजे केंबळी येथील सर्व समाज उपोषण करतील असा इशारा कागल तहसीलदार यांना मौजे केंबळी येथील बौद्ध समजातर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला. सदर निवेदनावर मौजे केंबळी येथील बौद्ध समजतील ग्राम्सथांच्या सह्या आहेत.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!