या प्रदूषणाचा दूधगंगा नदीतील पाण्यावर होणार परीणाम
पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : सिद्धनेर्ली ता. कागल येथील नदीकिनारा याठिकाणी असणाऱ्या व्यवसाय धारकाडून मोठ्या प्रमाणावर कचरा नदी काठी तसेच एकोंडी रस्त्याकडेला टाकला जात असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणवर कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे.
नदीकिनारा परिसरात मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणारे छोट मोठे दुकाने ,चिकन मटण आदी व्यवसायक मोठ्या प्रमानावर याठिकाणी आहेत .या ठिकाणी असणाऱ्या लोकांन कडून नको असलेला कचरा,प्लॅटिक बॅग, चिकन मटणचे व्यस्टेज आदी कचरा नदीकाठी आणि एकोडी रोड लगत टाकला जात आहे. हाच कचरा, चिकन मटणचे टाकाऊ भाग कुजल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरीकांना आणि रस्त्याने जाणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील व्यवसिक धारकांना वेळोवेळी सूचना देऊन देखील अजूनही मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येत आहे. याच्यावरती वचक बसण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागसरीका मधून होऊ लागली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी नदीकिनारा परिसरात कचऱ्याची मोठी दुर्गंधी सूटल्याने या ठिकाणा वरून एकोडी कडे जाणाऱ्या वाहनधारकांना नाक हातात धरूनच पुढे जावे लागत आहे.तसेच आता लवकरच पावसाळा सुरू होत आहे.हा कुजलेला कचरा वाहून नदीमध्ये जाणार आहे.यामुळे नदीतील पाणी देखील दूषित होणायची शक्यता आहे. याकडे वेळीच सिद्धनेर्ली ग्रामपंचायतने लक्ष देऊन संबधीत लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे.
या परिसरात असणाऱ्या व्यवसायिकांना वेळोवेळी सूचना करण्यात आल्या होत्या तसेच त्याना कचरा व्यवस्थापनचे नियोजन लावून देण्यात आले होते.पुन्हा याठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्याचे निर्दनास आले आहे त्यामुळे संबंधित लोकांना बोलवून रीतसर नोटीस देण्यात येईल त्यानंतर देखील जर पुन्हा कचरा टाकताना आढळल्यास त्याची दुकाने कायदेशीर सील करून परवाने रद्द करण्यात येतील.
(दत्तात्रय पाटील- सरपंच सिद्धनेर्ली ग्रा प.)