बातमी

चंद्रकांत माळवदे यांच्या ” गोवऱ्या आणि फुले ” आत्मचरित्रास सोलापुरे -संस्थेचा राज्यस्तर पुरस्कार जाहिर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल जेष्ठ पत्रकार व लेखक मा . श्री . चंद्रकांत माळवदे ( सर )यानीं लिहिलेल्या ” गोवऱ्या आणि फुले ” या त्यांच्या आत्मचरित्रास महागांव ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथिल जेष्ठ साहित्यिक प्रा . रसूल सोलापूरे बहुउद्देशीय संस्थेतर्फे सन२०२४चा राज्यस्तर पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

श्री. चंद्रकांत माळवदे यानां यापूर्वी गारगोरी येथिल ” अक्षर सागर मंच ” यांच्यातर्फै राज्यस्तर पुरस्कार प्राप्त झाला आहे .
मराठी साहित्यातील विविध विभागातील दर्जेदार साहित्यवृत्तीच्या निर्मितीबद्दल दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात . त्या अनुषंगाने ” गोवऱ्या आणि फुले ” या आत्मचरित्र्यपर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे .

येत्या काही दिवसात रोख रक्कम , सन्मान पत्र , स्मृतिचिन्ह देऊन माळवदे यानां सन्मानपूर्वक पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे . तसे शुक्रवार१४जून२०२४ रोजी संयोजक प्रा .रसुल सोलापूरे यानीं पत्राव्दारे माळवदे यानां कळविण्यात आले आहे .
या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल ” गोवऱ्या आणि फुले ” या आत्मचरित्रास उत्कृष्ठ निर्मितीबद्दल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळाले बद्दल लेखक श्री . चंद्रकांत माळवदे ( सर ) यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *