व्हॉलीबॉल स्पर्धेत शिवराज विद्यालयाचा तृतीय क्रमांक

मुरगूड ( शशी दरेकर ) : माजी आमदार स्व.पी.एन.पाटील यांच्या जयंतीनिमित्त शाहूनगर परिते ( ता.करवीर ) येथील राजर्षी छत्रपती शाहू पब्लीक स्कूलच्या क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या १४ वर्षाखालील व्हॉलीबॉल स्पर्धेत येथील शिवराज विद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

Advertisements

     स्पर्धेत शिवराजच्या संघाने साखळी सामन्यात गिरगांव व शाहुवाडी संघाचा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तळाशी संघाचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून उंपात्य फेरी गाठली. उंपात्य फेरीत तळसंदे संघाबरोबर झालेल्या चुरशीच्या सामन्यात शिवराजच्या संघाला पराभव पत्करावा लागला. तृतीय क्रमांकाच्या लढतीत राजर्षी छ. शाहू पब्लीक स्कूल परिते संघाला लिलया पराभूत करीत तृतीय क्रमांक पटकावला.

Advertisements

             या संघात तन्मय खैरे, विराट पाटील, साई भराडे, विश्वजित कांबळे, पियुष घोटणे, शुभम मुरगूडे, सार्थक कांबळे, रुद्र मोरबाळे, अंशराज कांबळे, मेघराज मंडलिक, ओंकार चौगले, बरकाळे यांचा समावेश आहे.

Advertisements

             या खेळाडूंना व्हॉलीबॉल प्रशिक्षक, माजी प्राचार्य महादेव कानकेकर, क्रीडा शिक्षक एकनाथ आरडे,  संभाजी मांगले, अजित गोधडे, विनोद रणवरे, सुहास भारमल, अमित साळोखे, गजानन गोधडे, श्रावण कळांद्रे व करण मांगले यांचे मार्गदर्शन लाभले. तर संस्था सेक्रेटरी मा.खा. संजयदादा मंडलिक, कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक, अध्यक्ष गजाननराव गंगापुरे, कार्यवाह आण्णासो थोरवत, प्र. प्राचार्य व्ही बी खंदारे ,उपमुख्याध्यापक  पी पी सुर्यवंशी, उपप्राचार्य इ.व्ही चौगुले यांचे प्रोत्साहन लाभले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!