मुरगुड (शशी दरेकर) :
मुरगूड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्यूनियर कॉलेजचा विद्यार्थी हर्षवर्धन संदीप चौगुले यांने हिरलोक (कुडाळ) येथे झालेल्या विभागस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ७३ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे स्पर्धक सहभागी झाले होते. स्नैच आणि क्लीन अँड जर्क मध्ये प्रत्येकी ३ प्रयत्नात हर्षवर्धनने स्पर्धेतील कमाल वजन उचलल्याने तो या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता ठरला. आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याचे तिकीट बुक झाले. या अजिंक्यपदामुळे त्याची सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तो सध्या शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजमधील बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे.
वेटलिफ्टिंग प्रशिक्षक विजय कांबळे यांचे त्याला मार्गदर्शन तर जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी खासदार संजय मंडलिक, अँड. वीरेंद्र मंडलिक, प्राचार्य पी. डी. माने, उपप्राचार्य रवींद्र शिंदे, वडील संदीप चौगुले, चुलते पंकज चौगले यांचे प्रोत्साहन मिळत आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,