मेळाव्याला जाण्यास शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना कर्नाटक पोलिसांनी अडवले

कागल : विक्रांत कोरे
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित महामेळावा टिळकवाडी (कर्नाटक) येथे असल्याने या मेळाव्यास शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय देवणे यांनाही निमंत्रित केले होते.ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरून जात असता कोगनोळी येथील आरटी- पीसीआर तपासणी नाक्यावर शांतता, सुव्यवस्था बिघडू नये या कारणाने महामेळाव्यात जाण्यास कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडवून धरले व त्यांना परत महाराष्ट्रात पाठवले. या घटनेचा जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी तीव्र निषेध केला.

Advertisements

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावच्या महामेळाव्यात जात असताना शिवसेना जिल्हाप्रमुख यांना कोगनोळी येथे रोखले व शांतता , सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मेळाव्यास सोडणार नाही असे कर्नाटक पोलिसांनी सांगितले. दरम्यान तपासणी नाक्यावर देवणे व पोलीस कर्मचारी यांच्यात वादावादी झाली.

Advertisements

त्यानंतर विजय देवणे आणि सेनापती कापशी, गडहिंग्लज मार्गे कर्नाटकात जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना संकेश्वर या ठिकाणी पुन्हा कर्नाटक जाण्यास मज्जाव केला. आपण अन्य मार्गाने बेळगावच्या मेळाव्याला जाणार असल्याचे सांगून देवणे यांनी कर्नाटक पोलिसांचा निषेध नोंदवला.

Advertisements
AD1

1 thought on “मेळाव्याला जाण्यास शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना कर्नाटक पोलिसांनी अडवले”

Leave a Comment

error: Content is protected !!