शिवरायांच्या जयघोषात मुरगूडमध्ये शिवजयंती साजरी

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहरामध्ये शिवजयंतीचा उत्साह बघावयास मिळाला. पहाटेपासून शिवतीर्थ मुरगूड येथे शिवज्योत घेऊन जाण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.

Advertisements

सकाळी मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांच्या हस्ते शिवमुद्रा प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला . यावेळी मुरगूड नगरपालिका स्टाफ उपस्थित होता.

Advertisements

यानंतर शिवभक्त मुरगुडकर यांचे वतीने मोफत शिवमूर्तींचे वाटप करण्यात आले .यांचे नियोजन शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोतदार ,तानाजी भराडे ,संकेत शहा ,संकेत भोसले, जगदीश गुरव, प्रकाश परिषवाड यांनी केले होते.

Advertisements

बाजारपेठेतील शिवभक्त धोंडीराम परीट व शिवप्रेमी यानीं शिवजयंती कार्यक्रमांमध्ये एस .टी चालक, वाहक ,मेकॅनिक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला .यावेळी ओंकार पोतदार यांचे जाणता राजा या विषयावरील व्याख्यान पार पडले.

मुरगूड शहरामध्ये सर्वच मंडळांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली .महाप्रसाद, मिरवणूक , मर्दानी खेळ , पोवाडा आणि संस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले होते. मुरगूड विद्यालय मार्फत मुलांच्या मर्दानी खेळाचे सादरीकरण शिवतीर्थ मुरगूड येथे केले.

एकंदरीत मुरगूड शहरामध्ये शिवरायांचा जयघोष आणि भगव्या ध्वजानीं , भगव्या पताकांचा सजलेला माहोल अशा वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!