भुदरगड साहित्यभूषण पुरस्कार जेष्ठ साहित्यिक राजन कोनवडेकर यांना जाहीर

मुरगूड ( शशी दरेकर ) : कोनवडे येथिल जेष्ठ साहित्यिक राजन कोनवडेकर तथा एन .डी. पाटील यानां भुदरगड साहित्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती मंचचे अध्यक्ष डॉ . मा. ग. गुरव यानी दिली.

Advertisements

राजन कोनवडेकर ही साहित्यिक ओळख पण त्याचे पूर्ण नांव नामदेव दत्तात्रय पाटील ( एन्.डी. सर ) असून ते निवृत्त माध्यमिक शिक्षक आहेत . त्याचबरोबर मुरगूड विद्यालय मुरगूडचे माजी विद्यार्थी आहेत . कोनवडे येथे निसर्गरम्य परिसरात त्यांचे निवासस्थान आहे .

Advertisements

अंगार आणि फुले ( काव्यसंग्रह ) , पाषाण झरा , फ्रेम लता ( कांदबरी ) , चिन्ना ( कथासंग्रह ) , अडाण्यांचे शहाणपण ( व्यक्ती विशेष ) , राज (न ) कारण ( चारोळी संग्रह ) अशी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत . अनेक साहित्य संमेलनातही त्यांचा सहभाग असतो .

Advertisements

भुदरगड साहित्यभूषण जिवन गौरव, लळीत रंगभूमी पुणे पुरस्कार , जेष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे साहित्य परिषद करवीर काशी , आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान , राजाराम साहित्य मंडळ चिकोत्रा खोरा ता. कागल, साहित्य परिषद बार्शी या पुरस्काराबरोबर राज्यस्तरीय अनेक पुरस्कार त्यानां मिळाले आहेत .

त्यानां भुदरगड साहित्यभूषण पुरस्कार मिळाल्याचे जाहिर होताच संयुक्त महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या जवाहर हायस्कूल निळपण, न्यू . इंग्लिश स्कूल, शिवसेना नेते कल्याणराव निकम, अभिनव करिअर अकॅडमी छात्रानीं व तेथील शिक्षक स्टाफ यांच्यासह अनेक मान्यवरानी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा यथोचित सत्कार करुन पुढील साहित्यीक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!