मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सुवर्णमहोत्सवी व प्रचक्रोशित नावाजलेली श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन २०२२ते २०२७ या सालाकरीता संस्थेच्या तज्ञ संचालकपदी श्री जगदीश भास्कर देशपांडे ( सी.ए. कोल्हापूर ) व श्रीमती भारती विनायक कामत ( मुरगूड ) यांची श्री लक्ष्मीनारायणच्या मुख्य शाखेत एकमताने निवड झाली. या निवडीच्यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. अनंत बस्तू फर्नांडिस हे होते.
या निवडप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. विनय श. पोतदार, जेष्ठ संचालक श्री जवाहर शहा, संचालक श्री पुंडलीक डाफळे, श्री दत्तात्रय तांबट, श्री चंद्रकांत माळवदे (सर ) , श्री . किशोर पोतदार, श्री रविंद्र खराडे , श्री . रविंद्र सणगर, श्री . दत्तात्रय कांबळे , संचालिका सौ . सुजाता सुतार , सौ . सुनिता शिंदे , कार्यलक्षी संचालक श्री . नवनाथ डवरी , सचिव श्री. मारूती सणगर, मुरगूडच्या मुख्यशाखेचे शाखाधिकारी सौ . मनिषा सुर्यवंशी, श्री . राजेंद्र भोसले ( शाखा सेना . कापशी ), श्री. रामदास शिऊडकर (शारवा- कूर ) , श्री. अनिल सणगर (शाखा -सावर्डे बु॥), श्री के. डी. पाटील (शारवा-सरवडे), अंतर्गत तपासणीस श्री श्रीकांत खोपडे तसेच सेवकवृंद उपस्थित होते. नुतन तज्ञ संचालकांचे निवडी बद्दल सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे